Saturday 14 February 2015

ओवीतला-लांडगा

धनगर मंडळींची आवडती ओवी हा महाराष्ट्रातील एक लोककविता प्रकार आहे. 


प्रकल्पाबद्दल

महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश – धनगर – लांडगे
भारतात आज गवताळ प्रदेशांना बऱ्याचदा पडित जमीन समजले जाते. या महत्त्वाच्या परिसंस्था असतात ज्यांचा पशुचारक जमातींकडून तसेच वन्यजीवांकडून व्यापकस्वरुपात वापर केला जातो. या वन्यजीवांत भारतीय लांडगे आणि माळढोक सारख्या प्रजातींचा समावेश होतो. ५० कोटी पाळीव पशुंसह भारत जगातील सर्वाधिक पशुधन घनता असलेल्या देशांपैकी एक आहे. या पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्यातला ५०% हून अधिक चारा या गवताळ परीसंस्थांमधून मिळतो.
पशुचारक, ज्यांची संख्या भारतीय लोकसंख्येच्या ७% एवढी आहे, ऐतिहासिक काळापासून म्हणजे अगदी ख्रिस्तपूर्व १५०० पासून या भूप्रदेशांचा वापर करत आलेले आहेत. असे असले तरी, सध्या पशुचारक (pastoral) जीवनपद्धती बदलण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. पशुचराई (pastoralism) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विकासासाठी गवताळ प्रदेशांचा बळी आणि पशुचराईला अनुकूल नसलेल्या उपक्रमांसाठी होणारा त्यांचा वापर थांबविण्यासाठी कोणतेच धोरण अस्तित्त्वात नाही.
डेक्कन पठारावरील गवताळ प्रदेश हे मानवजनित/मानवी (anthropogenic) दबावामुळे राखले गेले आहेत. भटके लोक (transhumant people) तसेच निवासी मेंढपाळ (shepherds) हे ऐतिहासिक काळापासून या क्षेत्रांचा वापर करत आलेले आहेत. ही क्षेत्रे विशेषतः सह्याद्रीच्या पावसाच्या सावलीतील भागात (rain shadow regions) आहेत जी मेंढपाळांना चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार स्थलांतर करायला भाग पाडतात.   
आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे गवताळ प्रदेश, ज्यांनी या रुक्ष परिस्थितीशी जुळवून घेतले आहे अशा, खूप साऱ्या संकटग्रस्त वन्य प्रजातींचे निवासस्थानही आहे. भारतीय लांडगा, काळवीट, माळढोक, भारतीय कोल्हा या सारख्या प्रजाती या गवताळ प्रदेशांमध्ये आढळून येतात. महत्त्वाचे म्हणजे यांसारख्या जास्तीजास्त प्रजाती संरक्षित क्षेत्रांच्या बाहेरच दिसून येतात. या परिसंस्थेचा व्यापक विस्तार आणि परंपरागतरित्या या भूमीचा वापर करीत आलेली येथील दाट घनतेची मानवी लोकसंख्या, गवताळ प्रदेशांच्या संवर्धनासमोर मोठे आव्हान उभे करतात. यामुळे या क्षेत्रांकडे पारंपारिक “संरक्षित क्षेत्र” दृष्टीने पाहता येत नाही किंवा त्या पद्धतीने यांचे व्यवस्थापनही करता येत नाही.
या परिसंस्थेत राहणारा एक प्रातिनिधिक (iconic) मांसाहारी प्राणी म्हणजे भारतीय लांडगा. भारतात त्यांचा वावर हा जास्तीतजास्त संरक्षित क्षेत्रांच्या बाहेरच असतो आणि त्यांच्या आहारातील जवळपास अर्धा भाग पाळीव प्रण्यांद्वारे भागविला जातो. असाही पुरावा आहे की भारतीय भूरा (grey) लांडगा हा लांडगा-कुत्रा या जातीत (clade) न मिसळलेल्या एका प्राचीन जातीचा आहे, जो त्याला जगातील इतर सर्व लांडग्यांपासून जनुकीयदृष्ट्या प्राचीन आणि वेगळा सिद्ध करतो. हे भारतीय लांडग्याच्या संवर्धनाला प्राधान्य देण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.
महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी; महाराष्ट्र वन विभागाच्या पुणे वन्यजीव विभागाने “ओवीतला-लांडगा” हा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट हे गवताळ प्रदेश, धनगर आणि लांडग्यांबद्दल मुलभूत माहिती मिळविणे आणि ती व्यवस्थापक, प्रसार माध्यमे आणि लोकांपर्यंत पोहचविणे हे आहे जेणेकरून चांगली समज निर्माण होईल जी भविष्यातील माहितीपूर्ण संशोधन आणि व्यवस्थापनास कारणीभूत ठरेल.
विशेषकरून, या प्रकल्पाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :     
  •  पश्चिम महाराष्ट्रातील मानवी वस्ती असलेल्या भूप्रदेशांतील लांडगे आणि इतर मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या विस्ताराचे (distribution) मूल्यमापन करणे.
  • लांडग्यांसह, सर्व नैसर्गिक कारणांमुळे धनगर आणि इतर निवासी मेंढपाळांच्या पाळीव प्राण्याच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यमापन करणे.
  • धनगरांच्या धार्मिक स्थळांच्या आणि नजीकच्या वर्षांत या स्थळांच्या अभिगम्यतेत झालेल्या बदलांच्या नोंदी घेणे.
  • पूर्वी विदेशी प्रजातींच्या लागवडीसाठी रुपांतरीत करण्यात आलेल्या सुप्याच्या गवताळ प्रदेशाची पुनर्स्थापना करणे कितपत शक्य आहे याचे मूल्यमापन करणे.
  • प्रातिनिधिक (iconic) गवताळ प्रदेश प्रजाती, माळढोक, याच्या विस्ताराचा नकाशा तयार करणे.
  • मेंढपाळ/धनगर/पशुचारक (shepherds) आणि ज्यांच्या सोबत ते राहतात ते लांडगे यांच्यातील संबंधांचे मूल्यमापन करणे.
  • गवताळ प्रदेशातील मानव आणि मोठे मांसाहारी प्राणी यांच्यातील परस्परक्रियांच्या राजकीय पैलूबद्दल माहिती मिळविणे.  
  • नागरी विज्ञानाचा वापर करून गवताळ प्रदेश आणि त्यातील मांसाहारी प्राणी यांच्या विस्ताराबद्दल माहिती मिळविणे.
References:
  1. Abi Tamim Vanak. 2013. Conservation & Sustainable Use of the Dry Grassland Ecosystem in Peninsular India: A Quantitative Framework for Conservation Landscape Planning. Submitted to the Ministry of Environment and Forests, Government of India.
  2. Anon. 2007. Report of the Task Force on Grasslands and Deserts. Government of India Planning Commission. New Delhi.
  3. Gadgil M., and K.P. Malhotra. 1982. Ecology of a pastoral caste: Gavli dhangars of peninsular India. Human Ecology (10): 107-143.
  4. Jhala Y,V. and R. H. Giles. 1991. The status and conservation of the wolf in Gujarat and Rajasthan, India. Conservation Biology 5: 476–483.
  5. Maurya, K.M., Habib, B. and S. Kumar, 2011. Food Habits of Indian Wolf (Canis lupus pallipes) in Decc an Plateau of Maharashtra, India. World Journal of Zoology 6 (3): 318-322.
  6. Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and Singh D.P. 2012. Socio Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of Maharashtra, India. J Rec Adv Agri, 1(3): 84-91.
  7. Sharma, V.P., Kohler-Rollefson, I. and J. Morton. 2003. Scoping study on pastoralism in India. Centre for Management in Agriculture, Indian Institute of Management (IMM), Ahmedabad, India and League for Pastoral Peoples, Ober-Ramstadt, Germany. 63 pp.
  8. Sontheimer, G-D. 1989. Pastoral Dieties in Western India. Oxford University Press. New York. USA.
  9. Trivedi, T.P. 2010. Degraded and wastelands of India. Status and Spatial Distribution. Indian Council of Agricultural Research New Delhi.
गवताळ प्रदेश
भारतात लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार गवताळ प्रदेश आहेत, यात मोठ्याप्रमाणावर भूमिहीन मेंढपाळ/धनगर आणि अल्पभूधारक आहेत ज्यांच्या निर्वाहाचे मुख्य साधन पशुपालन आहे. धनगरी/पशुचराई हा एक प्राचीन व्यवसाय आहे, आज धनगर/पशुचारक देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ७% आहेत आणि देशातील सकल घरेलू उत्पादनात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतात पाळीव पशूंची घनता खूपच दाट आहे आणि त्यांचा आहार म्हणजे एकतर स्वतःच्या जमिनीत पिकविलेला चारा/पिकांचा उरलेला भाग किंवा मग गायरानात उपलब्ध असलेला चारा. दुसऱ्या पर्यायाचा वापर करणारे लोक हे आपल्या जीवन निर्वाहासाठी जवळजवळ पूर्णपणे पशुपालनावर अवलंबून असतात.
परंतु वाढत्या सिंचन आणि शेती तसेच वाढत्या गुरचराईच्या दाबावामुळे गवताळ प्रदेश हे आता एक संकटग्रस्त परिसंस्था बनले आहेत. बऱ्याचदा यांना पडीत जमीनही समजले जाते. नियोजन आयोगाचा २०११ चा अहवाल सांगतो कि भारतातील कुरणाची जमीन १९४७ मधील ७ कोटी हेक्टरहून १९९७ मध्ये ३.८ कोटी हेक्टरपर्यंत घटली आहे. शिवाय, गायरानात अतिक्रमण करणाऱ्या (इंव्हेसीव) प्रजातीही उगवतात ज्या गुरांना खाता येत नाहीत आणि यामुळे पुन्हा जमिनीची उत्पादकता कमी होते. पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून लक्ष घातले गेले असतांना आणि नियोजन आयोग तसेच ग्रासलँड टास्क फोर्सकडून शिफारशी केल्या गेलेल्या असतांनाही, जमिनी स्तरावर गवताळ प्रदेशांच्या नियोजनार्थ काही ठोस कृती केली जात नाहीये.  
गवताळ प्रदेश परिसंस्था कि मुख्यत्त्वे मानवजनित (anthropogenic) घटकांमुळे राखली जाते जसे गुरचराई, (गवत)कापणे आणि जाळणे. या क्षेत्रांमध्ये मानवी लोकसंख्येची घनताही दाट आहे. याचे एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील डेक्कनच्या पठाराचा प्रदेश जो अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे, त्यात अनेक जातीसमुहांचे लोक राहतात. भटक्या गटाचे/समूहाचे एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे प्रवासी धनगर जे मेंढ्या आणि बकऱ्यांच्या मोठमोठ्या कळपांना घेऊन मोठ्या अंतराचा प्रवास करतात.  
अशाप्रकारे मानव आणि पाळीव पशूंच्या मोठ्या लोकसंख्येला सांभाळत असलेले महाराष्ट्रातील हे गवताळ प्रदेश माळढोक, भारतीय लांडगा, भारतीय कोल्हा, तरस, लेसर फ्लोरीकन इत्यादींसारख्या विविध वन्यजीवांचे निवासस्थानही आहेत.
या व्यवस्थेची गुंतागुंतीची प्रकृती, तिची उच्च उत्पादकता, मानवजनित कारणांमुळे तिचा होणारा सांभाळ, मोठ्या संख्येने माणसांचे आणि विविध प्रकारच्या वन्यजीव प्रजातींचे तिच्यावरील अवलंबित्व या सर्वांचा विचार करता गवताळ प्रदेशांचे संवर्धन हे एक आव्हानात्मक काम आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट हे महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशांचे महत्त्व, त्यांवर व्यापकस्वरुपात अवलंबून असलेल्या धनगर आणि लांडगे यांच्या दृष्टीने, समजून घेणे आहे.
References:
  1. Abi Tamim Vanak. 2013. Conservation & Sustainable Use of the Dry Grassland Ecosystem in Peninsular India: A Quantitative Framework for Conservation Landscape Planning. Submitted to the Ministry of Environment and Forests, Government of India.
  2. Anonymous.1988. National Forest Policy. Ministry of Environment and Forests. New Delhi.
  3. Anonymous. 2007. Report of the Task Force on Grasslands and Deserts. Government of India Planning Commission. New Delhi.
  4. Anonymous. 2011. Report of the Sub Group III on Fodder and Pasture Management. Constituted under the Working Group on Forestry and Sustainable Natural Resource Management. Planning Commission of India.
  5. Trivedi, T.P. 2010. Degraded and wastelands of India. Status and spatial Distribution. ICAR. New Delhi.
धनगर
पशुचराई हा पशुपालन आणि त्याशी संबंधित क्रियांवर अवलंबून असलेला व्यवसाय आहे जो भारतात गेल्या ३५०० वर्षांपासून केला जातो आहे. आज पशुचारक भारतातील एकूण लोकसंख्येच्या ७% असून पश्चिम भारताच्या शुष्क प्रदेशांमध्ये, डेक्कन पठारावर आणि हिमालयात त्यांचा वावर आहे.   
प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळून येणारा एक पशुचारक समूह म्हणजे धनगर जो एक पारंपारिक निम-भटका समूह आहे. ते मोठ्याप्रमाणावरील मेंढ्यांच्या कळपांसह बकऱ्या, म्हशी, घोडे, कुत्रे आणि कोंबड्या पाळतात. कळप सांभाळणे, चरायला नेणे, दुध काढणे, मेंढ्यांना बाळंतपणात मदत करणे, जनावरांची काळजी घेणे इत्यादी कामे पुरुष आणि महिला वाटून घेतात.
पशुचराई ही भरतात एक महत्त्वाची जीवन पद्धती असली तरीही याबाबतीत कोणतेही अधिकृत असे पशुचारक धोरण अस्तित्वात नाही. पशुचारक आणि धनगरांबद्दल अत्यंत थोडी पर्यावरणीय आणि मानववंशशास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. परंतु धनगरांच्या धर्मावर मात्र खूपच काम करण्यात आलेले आहे.  
हा प्रकल्प धनगरांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे आणखी एक कारण म्हणजे स्थिर शेतकरी आणि पशुचारक यांच्या विरुद्ध, आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांच्या मोठमोठ्या कळपांसह चाऱ्याच्या शोधात धनगर मंडळी शेकडो मैलांचा प्रवास करत, संपूर्ण गवताळ प्रदेश पिंजून काढत असतात. गवताळ प्रदेशांअभावी त्यांना त्यांच्या जीवन निर्वाहाचे साधन असलेला चारा मिळणार नाही.
धनगरांचा त्यांच्या गुरांना खाणाऱ्या लांडग्यांशी सतत संबंध येतो. परंतु हा संबंध आपल्या अपेक्षेप्रमाणे शत्रुत्त्वाचा नसतो. खरतरं, त्यांच्या एका ओवीत धनगर देवाने धनगरांनी नेहमी तयार राहावे यासाठी कशाप्रकारे लांडग्याची निर्मिती केली अशी आठवण सांगतली जाते.


हटकर धनगरांवरील एक चित्रपट 
http://www.onlinefilm.org/en/film/51111
हटकर धनगरांचा प्रवास

References:
  1. Gadgil M., and K.P. Malhotra. 1982. Ecology of a pastoral caste: Gavli Dhangars of peninsular India. Human Ecology (10): 107-143.
  2. Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and Singh D.P. 2012. Socio Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of Maharashtra, India. J Rec Adv Agri, 1(3): 84-91.
  3. Sharma, V.P., Kohler-Rollefson, I. and J. Morton. 2003. Scoping study on pastoralism in India. Centre for Management in Agriculture, Indian Institute of Management (IMM), Ahmedabad, India and League for Pastoral Peoples, Ober-Ramstadt, Germany. 63 pp.
  4. Sontheimer, G-D. 1989. Pastoral Deities in Western India. Oxford University Press. New York.


लांडगे
उत्तर अमेरिका, आफ्रिका, एशिया आणि युरोप मध्ये पसरलेले लांडगे सर्वांत व्यापक अस्तित्व असलेल्या मांसाहारी प्राण्यांपैकी एक आहेत. जनुकीय चिन्हांचा वापर करून आताच केल्या गेलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे कि भारतात तीन वेगवेगळ्या जातीचे लांडगे आहेत ज्यातील दहालाख वर्षांपूर्वीचा हिमालयीन लांडगा हा सर्वांत जुना आहे. शुष्क द्वीपकल्पीय गवताळ प्रदेशातील लांडगा हा ४,००,००० वर्षांपूर्वीचा आहे. लांडगा-मानव यांच्यातील परस्परक्रिया १,५०,००० वर्षांपासून सुरु आहेत जेव्हापासून लांडग्यांना मणसाळवून आपला सोबती प्राणी बनवले गेले, कोण? – कुत्रा.
लांडग्यांच्या सततच्या अस्तित्वासाठी तीन गोष्टी निर्णायक आहेत; अधिवास, भक्ष्य आणि जी त्यांना जिवंत राहू देतात अशी माणसे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील अनेक भागांमधून लांडगे नाहीसे होण्याचे प्रमुख कारण माणसांकडून होणारा छळ होते. वाढत्या संवर्धन आणि संरक्षण प्रयत्नांमुळे आता कुठे या भागांमधील आपल्या ऐतिहासिक वास्तव्याच्या काही क्षेत्रांत लांडगे पुन्हा आपले बस्तान बसवत आहेत.
आजही भारतात लांडगे हे मानवी वस्ती असलेल्या प्रदेशांतच प्रामुख्याने आढळून येतात. सुदैवाने, अमेरिका आणि युरोपप्रमाणे ते भारतीय संस्कृती आणि समाजाशी नकारात्मकरित्या जोडले गेलेले नाहीत आणि त्यांचा छळ होत असला तरी संपूर्ण डेक्कन पठारावर त्यांचे वास्तव्य अजूनही आढळून येते. लांडग्यांचा विस्तार भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये दिसून येतो. लांडगा हा समाजप्रिय प्राणी आहे, तो कळपात राहतो. लांडग्यांच्या मोठ्या कळपांचे शिकार क्षेत्र (range) जवळजवळ ३०० चौ.किमी असते म्हणून त्यांना मोठ्या भूप्रदेशाची गरज असते. त्यांचे व्यापक क्षेत्र आणि समूहात राहण्याची प्रवृत्ती सुद्धा सुचवितात कि केवळ संरक्षित क्षेत्रांपुरते मर्यादित संवर्धन आणि व्यवस्थापन यांना लागू करता येऊ शकत नाही.
काळवीट, चिंकारा यांसारखे वन्य भक्ष्य हे जरी लांडग्यांसाठी महत्त्वाचे असले तरी, त्यांच्या शिकार क्षेत्रांत मेंढ्या आणि बकऱ्यांचीही दाट वस्ती असते जे लांडग्यांच्या आहाराचा मोठा भाग आहेत, बऱ्याच वेळेस जवळजवळ ५०% एवढा. यावरून असेही लक्षात येते कि स्थानिक पशुचारकांचे लांडग्यांच्या लुटालूटीमुळे नुकसान होते आणि मग ते लांडग्यांच्या राहण्याच्या जागा – गुहा (dens) नष्ट करतात.
भारतात मानवी वापरातील भूभागांमध्ये मानवासोबतच्या त्यांच्या परस्परक्रियांबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. परस्परक्रीयांवरील पर्यावरणीय अभ्यासात प्रामुख्याने “संघर्ष” या पैलूवरच जास्तीतजास्त लक्ष केंद्रित झालेले दिसते.  

References:
  1. www.wolf.org
  2. Agarwala, M., Satish Kumar, Treves, A. and L. Naughton-Treves. 2010. Paying for wolves in Solapur, India and Wisconsin, USA: Comparing compensation rules and practice to understand the goals and politics of wolf conservation. Biological Conservation 143: 2945–2955.
  3. Habib, B. 2007. Ecology of Indian Wolf (Canis lupus pallipes Sykes, 1831) and modeling its potential habitat in the Great Indian Bustard Sanctuary, Maharashtra, India. Aligarh Muslim University.
  4. Jethva, B.D. and Y.V. Jhala. 2004. Foraging ecology, economics and conservation of Indian wolves in the Bhal region of Gujarat, Western India. Biological Conservation 116: 351–357.
  5. Jhala, Y.V. & Giles, J.R. (1991). The status and conservation of the wolf in Gujarat and Rajasthan, India. Conserv. Biol. 5, 476–483.
  6. Jhala, Y.V. (2003). Status, ecology and conservation of the Indian wolf Canis lupus pallipes sykes. J. Bombay Nat. Hist. Soc. 100: 293–307.
  7. Jhala, Y.V. and D. K. Sharma. 2004. The Ancient Wolves of India. International Wolf.
  8. Musiani, M. and P.C. Paquet. 2004. The Practices of Wolf Persecution, Protection, and Restoration in Canada and the United States. BioScience 51.
  9. Sharma, D.K., Maldonado, J.E., Jhala, Y.V. and R.C. Fleischer.2004. Ancient wolf lineages in India. Proceedings of the Royal Society B. Biology Letters 271: S1–S4.
  10. Singh, M. and H. N. Kumara. 2006. Distribution, status and conservation of Indian gray wolf (Canis lupus pallipes) in Karnataka, India Journal of Zoology 270: 164–169.
                                                                         आमची टीम
वन विभाग
श्री सुनील लिमये
 श्री सुनील लिमये हे पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वन संरक्षक (Chief Conservator of Forests) आहेत. यांनी मानव-वन्यजीव संघर्ष शमविण्यासाठीचा दीर्घकालीन उपाय शोधता यावा म्हणून वेगवेगळ्या लाभधारकांचा समावेश असलेल्या अनेक सहभागी प्रकल्पांवर काम केले आहे.
प्रकल्प समन्वयन
कीर्ती जमदाडे
  कीर्ती जमदाडे या सहाय्यक वन संरक्षक आहेत. त्या वन विभागाच्या फिल्ड टीमचे नेतृत्त्व करतील.
अनुज खरे
   अनुज पुणे जिल्हा वन्यजीव प्रबंधक आहेत. निसर्ग शिक्षण क्षेत्रात ते गेल्या १७ वर्षांपासून काम करीत आहेत. वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यासोबत त्यांचे काम चालते, ते अनेक स्वयंसेवी (NGO) संस्थांचे सल्लागार देखील आहेत.
विद्या अत्रेय
  विद्या अत्रेय वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी, इंडिया येथे मांसाहारी प्राणी अभ्यासक (कार्निवोर बायोलॉजीस्ट) आहेत. त्या मानवी वास्तव्य असलेल्या भूप्रदेशांतील बिबट्यांच्या परिसंस्थेवर वर काम करीत आहेत. डेक्कन पठारावरील लांडगे आणि मोसमी पशुचारक (transhumant pastoralists) यांच्यातील परस्परक्रियांमध्येही त्यांना रुची आहे.  
वन्यजीव पर्यावरण शास्त्रज्ञ
गिरीश पंजाबी  
   गिरीश वन्यजीव अभ्यासक आहेत. मांसाहारी प्राणी आणि मानवाशी होणाऱ्या त्यांच्या परस्परक्रिया समजून   घेण्यात आणि या ज्ञानाचा वापर संवर्धनासाठी करण्यात त्यांची विशेष रुची आहे. ते भारतातील शुष्क प्रदेशांतील वन्य मांसाहारी प्राण्यांचा आणि गवताळ प्रदेशांच्या ठिकाणांचा सिटीझन सायन्स डेटाबेस (नागरी विज्ञान माहितीसंच) तयार करणार आहेत. (He will be creating a citizen science database of locations of grasslands and wild carnivores of the dry biome of India).
त्रीशांत सिमलाई  
   त्रीशांतला प्रामुख्याने संरक्षित क्षेत्र नियोजन (प्रोटेक्टेड एरिया प्लानिंग), संवर्धनातील निर्णय प्रक्रिया, राजकीय पैलू (political ecology) आणि मानव-वन्यजीव परस्परक्रिया यांत विशेष रुची आहे. या प्रकल्पात ते गवताळ प्रदेश संवर्धनाचे राजकीय पैलू आणि मानव-वन्यजीव परस्परक्रिया यांवर काम करणार आहेत, विशेषकरून ते महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश परीसंस्थांतील मानव-वन्यजीव परस्परक्रियांच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रेरकांचा अभ्यास करतील.

भारतविद्या तज्ञ (इंडोलॉजीस्ट)
सायली के. पलांडे - दातार  
  सायली यांनी भारतविद्या आणि इतिहासाचे औपचारिक शिक्षण घेतलेले असून गेल्या ११ वर्षांपासून त्या महाराष्ट्रात विविध पर्यावरणीय समस्यांवर काम करीत आहेत.  धनगर समाजाच्या प्रवास मार्गांवरील धार्मिक आणि निवासी स्थळांचा शोध घेण्यात त्यांना रुची आहे, विशेषकरून त्यांच्या स्मारक स्थळांचा. मानववंश-पुरातत्त्वशास्त्राच्यादृष्टीने या स्थळांचा अभ्यास त्यांना करायचा आहे. काळाच्या ओघात, अभिगम्यतेवर(accessibility) झालेल्या परिणामांचा आणि सांस्कृतिक प्रदेशांत झालेल्या बदलांमुळे झालेल्या या स्थळांच्या नाशाचा अभ्यासही त्यांना करायचा आहे.
नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या पशुचारकांच्या पशुधनाच्या नुकसानीचे मूल्यमापन
नित्या गोटगे
   नित्या गोटगे या एक पशुवैद्य आहेत आणि अंतरा या पशुधन विकासावर काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या भटक्या पशुचारक (nomadic pastoral) जमातींसोबत काम करत आहेत, विशेषकरून महाराष्ट्रातील धनगरांसोबत. 


 महाराष्ट्राच्या गवताळ प्रदेशांतील माळढोकचा प्रसार
प्रमोद पाटील  
   डॉ.प्रमोद पाटील हे वन विभागात उपलब्ध माहितीच्या आधारे गवताळ प्रदेशातील एक महत्त्वाची पक्षी प्रजाती, माळढोकच्या (ग्रेट इंडिअन बस्टर्ड) प्रसाराचे मूल्यमापन करतील.
धनगर आणि लांडगे यांच्यातील परस्परक्रिया
अपर्णा वाटवे  
  अपर्णा वाटवे या टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांनी समाज आणि पर्यावरण यांच्यातील परस्परक्रियांचा अभ्यास करणाऱ्या अनेक प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.


पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या मांसाहारी प्राण्यांचा प्रसार
विद्या अत्रेय  
   विद्या अत्रेय या कार्निवोर बायोलॉजीस्ट आहेत. त्या मानवी वास्तव्य असलेल्या प्रदेशांत बिबट्यांच्या परिसंस्थेवर काम करीत आहेत. डेक्कन पठारावरील लांडगे आणि मोसमी पशुचारक यांच्यातील परस्परक्रियांमध्येही त्यांना रुची आहे.
टीम सदस्य
इरावती माजगावकर  
   इरावती या वन्यजीव जीवशास्त्र आणि संवर्धनशास्त्राच्या विध्यार्थिनी आहेत, याशिवाय वन्यजीव विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांतही त्यांची रुची आहे. मानव आणि त्याच्याभोवतीचा नैसर्गिक परिसर यांच्यातील संबंध आणि त्यातून होऊ शकणारे भूप्रदेश किंवा परिसंस्था संवर्धन समजून घेण्यात त्यांची प्रामुख्याने रुची आहे.
श्वेता शिवकुमार 
   श्वेता यांना मानव-वन्यजीव परस्परक्रिया समजून घेण्यात रस आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशांतील या बाबतीतील वास्तविकता जाणून घेण्याची उत्सुकताही आहे. लांडगे, तरस आणि बिबटे या तीन प्रजातींबद्दल खूपच कमी लोकांना बरोबर माहिती आहे आणि या रोमहर्षक प्रकल्पांतून त्यांना या प्राण्यांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.